रत्नागिरी : गावखडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहिम

रत्नागिरी : गावखडी ग्रामपंचायत आणि शिवार आंबेरे महाविद्यालयाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून किनाऱ्याची स्वच्छता केली. गावखडी ग्रामपंचायत, रत्नागिरी यांच्या आवाहनानुसार सरस्वती विद्यामंदिर गावखडी, शिवार आंबेरे महाविद्यालयातील विद्यार्थी, अंगणवाडी शिक्षक, जि. प. शाळा शिक्षक, आशा वर्कर्स, बचत गट महिला, पंचायत सदस्य, मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्स कंपनीचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाऊंडेशनने सहभागींना अल्पोपहार देऊन या मोहिमेला पाठिंबा दिला. या मोहिमेदरम्यान, ग्रामपंचायत सदस्य आणि शाळांनी हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी फिनोलेक्स आणि एमएमएफने घेतलेल्या सततच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

समुद्रकिनारा स्वच्छ राखण्याची शपथ
स्वच्छता मोहिमेत लोकांना सहभागी करून घेत त्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संवेदनशील बनवणे आणि समुद्रकिनारे स्वच्छ राखण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे हा कंपनीचा उद्देश आहे. यावेळी सर्व उपस्थितांनी समुद्रकिनारी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 07/Oct/2024