लांजा : रिक्षात सापडलेला मोबाईल मालकाला केला परत

लांजा : रिक्षात सापडलेला मोबाईल मालकाला परत करून आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणारे लांजा शहरातील रिक्षाचालक कृष्णा जाधव यांचे कौतुक केले जात आहे.

लांजा शहरात रिक्षा व्यवसाय करणारे आणि जा तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेचे सभासद असलेल्या कृष्णा जाधव यांना आपल्या रिक्षामध्ये एक मोबाईल आढळून आला होता. त्यांनी मोबाईल सापडल्यानंतर मालकाचा शोध घेतला. सदर मोबाईल हा श्रीकांत तानवडे यांचा होता. रिक्षातून प्रवास करताना तो रिक्षात राहुन गेला होता. मात्र कृष्णा जाधव यांनी त्यांना तो मोबाईल परत केला.

अशाप्रकारे मोबाईल परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणारे रिक्षा व्यावसायिक कृष्णा जाधव यांचेवर चव्हाटा पिंपळ स्टॉप रिक्षा व्यावसायिक व नागरिक यांच्याकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 28/Mar/2025