रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक तथा चालक कमवाहकांना कर्तव्य बजावत असताना गणवेश परिधान करणे सक्तीचे आहे. गणवेश नसेल, तर दंडात्मक कारवाई केली जाते. सध्या उकाड्यामुळे रत्नागिरी विभागातील काही चालक शर्टचे वरचे बटन उघडून किंवा शर्ट काढून कर्तव्य बजावत असल्याचे निदर्शनास येते. प्रचंड उष्मा असल्यामुळे उन्हाळ्यात गणवेश नियमामध्ये शिथिलता देण्याची मागणी होत आहे.
चालक, वाहक, वाहक कम चालकांना गणवेश, नेमप्लेट व बिल्ला परिधान करणे सक्तीचे आहे. चालकाच्या केबीनमध्ये इंजिन, एसटीचा सांगाडा पत्र्याचा असल्याने उन्हामुळे तो अधिक तापतो. त्यातच गणवेशाचे कापड जाड असल्यामुळे उकाडा असह्य होत असल्याने आठ महिने अपडेट राहणार चालक उन्हाळ्यातील चार महिने अस्वस्थ असतात.
त्यातच लांब पल्ल्याचा प्रवास असल्यास अधिक त्रास होतो. त्यामुळे शर्टचे वरचे बटन उघडे ठेवणे किंवा शर्ट काढून कर्तव्य बजावत असतात. प्रचंड उष्मा असल्यामुळे उन्हाळ्यात गणवेश नियमामध्ये शिथिलता देण्याची मागणी होत आहे.
एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा गणवेश निश्चित असून, कर्तव्यावर असताना तो परिधान करणे आवश्यक आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार ड्युटीवर असताना गणवेश परिधान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 31/Mar/2025












