रत्नागिरी : जेलनाका कॉर्नरवर साकारतेय तुळशी वृंदावन !

रत्नागिरी : आळंदीप्रमाणे रत्नागिरी शहरातही तुळशी वृंदावन साकारणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून होणारे हे तुळशी वृदांवन शहराची शोभा वाढवणारे ठरणार आहे.

जेलनाका सिग्नलकडून गोगटे कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरवर हे वृदांवन होणार आहे. जेलनाका सिग्नलकडून कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याच्यावरच्या सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या कार्यालयालगत वापरात नसलेली जागा आहे. ही जागा वापरात यावी, यासाठी पालकमंत्र्यांनी आळंदीप्रमाणे तुळशी वृंदावन करून तो परिसर सुशोभित करण्याचे नियोजन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 01/Apr/2025