दापोली : तालुक्यातील कादिवली ग्रामपंचायत व दापोली तालुका पंचायत समितीतर्फे कृषी मेळावा पार पडला. यावेळी कृषी विभागातर्फे रोशनी जाधव, भरत भुसारे यांनी कृषी विषयक मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी संतोष मांडवकर, एकनाथ मोरे यांचा ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रमोद माने, उपसरपंच अनंत काते, ग्रामविकास अधिकारी रेश्मा सोनावणे उपस्थित होते. असंख्य शेतकऱ्यांनी या मेळाव्याला हजर राहून लाभ घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 02/Apr/2025














