रत्नागिरी : गेल्या वर्षभरापासून जिल्हयात रिक्त असलेल्या मानद वन्यजीव रक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक यांनी जारी केलेल्या पत्रात ७ एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवारांनी वनवृत्त कार्यालयाच्या इमेलवर अर्ज दाखल करायचे आहेत.
वन्यजीव व वनांच्या रक्षणासाठी मदत होण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात जिल्हयात या पदांच्या नियुक्त्या झाल्या नसल्याने वन्यजीवांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले जात नव्हते. त्यामुळे वनविभागाने पुन्हा एकदा मानद वन्यजीव रक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 02/Apr/2025
