रत्नागिरी, ०९ एप्रिल २०२५: रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील रेमंड शॉपजवळील एका गंभीर प्रकरणात स्विफ्ट व्हीएक्सआय मॉडेलची लाल रंगाची कार चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. ही घटना ०६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली असून, फिर्यादी समिर पंडलिक सतार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.
फिर्यादी समिर पुंडलिक सुतार (वय ३०, मुळ रा. भादवन, ता. आजरा, जि. कोल्हापूर, सध्या रा. साईश्री अपार्टमेंट, रूम नं. २०५, रेमंड शॉपजवळ, शिवाजीनगर, ता. जि. रत्नागिरी) यांनी सांगितले की, त्यांची स्वतःच्या मालकीची लाल रंगाची स्विफ्ट व्हीएक्सआय कार (नं. एमएच-०२/बीवाय/९८०८) त्यांनी आरोपी निलेश रविंद्र फरांदे याला भाडे तत्वावर दिली होती. मात्र, गाडी परत मिळावी म्हणून त्यांनी वारंवार मागणी केल्यानंतरही आरोपीने गाडी परत केली नाही. त्यानंतर आरोपी क्रमांक २ गणेश मारणे याने फिर्यादी यांना फोन करून गाडीचा अपघात झाला असून ती गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवल्याचे सांगितले. त्यांनी गाडीचे फोटो पाठवले आणि दोन दिवसांत गाडी परत देण्याचे आश्वासन दिले. परंतु, गाडी परत न देता आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली की, “तू पोलिसांत तक्रार केलीस तर तुझं काही खरं नाही.”
या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे (गु.र.नं. १३५/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), ३५१(४), ३(५)). आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
निलेश रविंद्र फरांदे, रा. पाटलाची आळी, आणेवाडी, ता. जावळी, जि. सातारा
गणेश मारणे (पूर्ण नाव माहीत नाही), रा. कोथस्ड, पुणे
गुन्हा ०८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३:३५ वाजता नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरीस गेलेली स्विफ्ट व्हीएक्सआय कार (नं. एमएच-०२/बीवाय/९८०८) परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 09-04-2025














