खेडमध्ये धावला पाण्याचा पहिला टँकर

खेड : तालुक्यातील पहिला टँकर सोमवारी घेरारसाळगड-बुथराईवाडी येथे धावला. काही कारणास्तव सहा दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने अखेर ग्रामस्थांना दिलासा मिळाला. या पाठोपाठ दोन-तीन दिवसांतच खवटी खालची धनगरवाडी येथेही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रणरणत्या उन्हामुळे आटलेल्या जलस्रोतांमुळे बुथराईवाडीतील घेरारसाळगड-ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्याकरिता प्रशासनाकडून दाखलाही प्राप्त झाला होता. यासाठी ग्रामस्थांना सहा दिवस प्रतीक्षा करावी लागली. अखेर पंचायत समितीच्या पाणी विभागाने सोमवारी घेरारसाळगड – बुथराईवाडीतील ग्रामस्थांसाठी पाण्याचा पहिला टँकर पाठवला. चिरणी-धनगरवाडी, वावेतर्फे ढेबेवाडी, खवटी-खालची धनगरवाडी येथील ग्रामस्थही अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 09/Apr/2025