दापोली (रत्नागिरी), ०९ एप्रिल २०२५: दापोली तालुक्यातील नवानगर तांबडीकोंड येथील एका पंप हाऊसमध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध तपास सुरू आहे. ही घटना ०४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ०८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत घडली असल्याचे फिर्यादी ततीक्षा सदर्शन गायकवाड यांनी सांगितले.
फिर्यादी ततीक्षा गायकवाड (वय ४४, मळ, काळकाईकोड, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नवानगर तांबडीकोंड येथील जमिनीवर बांधकाम केलेल्या पंप हाऊसमधील साहित्य चोरीस गेले आहे. अज्ञात चोरट्याने सिमेंटच्या दरवाज्याची कडी वाकवून दरवाजा फोडला आणि आत ठेवलेले मौल्यवान साहित्य चोरून नेले. या चोरीमुळे फिर्यादी यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून, चोरीस गेलेल्या मालाचे एकूण मूल्य ५२,६०० रुपये आहे.
चोरीस गेलेला माल
४८,००० रुपये: कंपाऊंड करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी तारेचे ८ बंडल (४ फूट उंच आणि ५० फूट लांबीचे)
२,००० रुपये: एक पाण्याचे बोअरिंगचा स्टार्टर
२,४०० रुपये: दोन पाण्याचे पाईप (१०० फूट लांबीचे, गुलाबी आणि केशरी रंगाचे, १ इंची मापाचे)
२०० रुपये: दोन लोखंडी पहार
१,००० रुपये: ए.सी.सी. सिमेंटच्या ०३ बॅग
या प्रकरणी दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (गु.र.नं. ६५/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५) हा गुन्हा ०८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५:१७ वाजता नोंदवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 09-04-2025














