लांजा (रत्नागिरी), ०८ एप्रिल २०२५: लांजा तालुक्यातील वाकेड मावळतवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू गैरकायदेशीरपणे साठवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी ७१ वर्षीय आरोपी उमाजी सखाराम माटल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. ही कारवाई ०८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:४५ वाजता करण्यात आली.
लांजा पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश नवनाथ (पो.कॉ/१५७७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकेड मावळतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका फणसाच्या झाडाच्या आडोशात गावठी दारू साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली असता, आरोपी उमाजी सखाराम माटल (वय ७१, रा. वाकेड मावळतवाडी, ता. लांजा) याच्या ताब्यातून ७ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. ही दारू गैरकायदेशीरपणे आणि परवान्याशिवाय विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आली होती.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे (गु.र.नं. ८१/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत). गुन्हा ०८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४:४३ वाजता नोंदवण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या दारूचे एकूण मूल्य ७५० रुपये आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून, तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 09-04-2025














