राजापूर : नगरपालिकेने शहरात प्रशस्त आणि सुसज्ज मच्छीमार्केट उभारले आहे. तिथे मासेविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही अनेक महिला शिवाजीपथ रस्त्याच्या कडेला बसून मासे विकतात. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली. विक्रीला ठेवलेले मासेही जप्त केले; मात्र कालांतराने त्यांच्या विरोधातील प्रशासकीय कारवाई थंडावली असून, पुन्हा एकदा शिवाजीपथ रस्त्याच्या कडेला बिनदिक्कत मासेविक्री सुरू आहे.
शहरातील मुन्शी नाका परिसरामध्ये मच्छी विक्रेत्यांसाठी पालिकेने मच्छीमार्केट उभारलेले आहे. त्या गठिकाणी मासेविक्री करण्यासाठी ओटे आणि अन्य आवश्यक सोयीसुविधाही – दिलेल्या आहेत. तिथे बसून मासेविक्री ८ करणाऱ्यांकडून पालिका करही घेते. त्याच्यातील मर्यादित उत्पन्न न असलेल्या क वर्गीय नगरपालिकेला डी उत्पन्नही मिळते. त्या मच्छीमार्केटमध्ये सुविधा असतानाही अनेक महिला मासेविक्रीसाठी अर्जुना-कोदवली नदीकाठावरील शिवाजीपथ रस्त्यावर बसलेल्या असतात.
त्यामुळे शिवाजीपथ रस्त्यावर मासे खरेदी करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तिथे दुचाकी, चारचाकी गाड्या उभ्या करून ठेवल्यामुळे वाहतूककोंडी होते. या ठिकाणी मासेविक्री करू नये, अशी सूचना वारंवार पालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यानंतर तिथे मासेविक्रीसाठी बसणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. त्यामध्ये मासेविक्री करणाऱ्या महिलांचे मासे जप्त केले होते. मात्र, रस्त्याच्या कडेला मासेविक्री करणाऱ्यांविरोधात प्रशासकीय कारवाई थंडावलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवाजीपथ रस्त्याच्या कडेला मासेविक्री सुरू झाली आहे. परिणामी, वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.
अशी होते वाहतूककोंडी
ज्या भागामध्ये महिला मासेविक्रीसाठी बसतात तिथे रिक्षास्टॅन्ड आहे. तसेच, मोठ्या चारचाकी गाड्या आणि टेम्पोही रस्त्याजवळ उभे करून ठेवलेले असतात. त्याचवेळी कोल्हापूर वा अन्य भागातून घाऊक माल घेऊन आलेले ट्रकही उभे करून ठेवतात. वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यावरून वाहने चालवणे अशक्य होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 09/Apr/2025














