Ratnagiri DCC Bank Training: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेतर्फे ३१ जुलैपासून सहकार कार्यकर्ता प्रशिक्षण

चिपळूण येथील मांडकी-पालवणमध्ये निवासी प्रशिक्षणाचे आयोजन; २८ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Ratnagiri DCC Bank Training: रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकार क्षेत्रातील नामांकित ‘डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील प्रबंध संस्थान, पुणे’ या प्रशिक्षण संस्थेद्वारे विशेष निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील ‘कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था’ येथे ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप व उद्देश

हे प्रशिक्षण सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सहकारातील आधुनिक तंत्रज्ञान, बँक व्यवसाय, विकास आणि इतर सर्व सहकारी संस्थांच्या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची व अद्ययावत माहिती देण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

Amey jwelrs

२८ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

प्रशिक्षणात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी आपापल्या तालुक्यातील बँकेचे क्षेत्रीय कार्यालय अथवा रत्नागिरी येथील प्रधान कार्यालयातील प्रशासन विभागाशी संपर्क साधावा. इच्छुकांनी आपले अर्ज २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण संस्थेमार्फत अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:56 23-07-2026