मंडणगडहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या कारला दारूच्या नशेत आलेल्या चालकाने दिली धडक; चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Chiplun Accident News: चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कार चालवत दुसऱ्या कारला जोरदार धडक देऊन अपघात घडवल्या प्रकरणी एका वाहनचालकाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात इनोव्हा कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मंडणगड ते रत्नागिरी प्रवासादरम्यान अपघात
या प्रकरणी तेजस तानाजी कोकरे (वय ३६, रा. नाचणे, राजमोगरा विहार, ता. जि. रत्नागिरी) यांनी चिपळूण पोलिसांत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तेजस कोकरे हे आपल्या ताब्यातील कारमधून (क्र. MH-08-BB-1511) प्रवाशांना घेऊन मंडणगड येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होते.
दारूच्या नशेत कार चालवून अपघात
प्रवास सुरू असताना चिपळूण तालुक्यातील तांबटकरवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी इको (क्र. MH-08-E-4720) या कारच्या चालकाने निष्काळजीपणा दाखवला. संशयित चालक उमेर गणी कुरेशी (वय ५२, रा. खेडी मोरेवाडी, ता. चिपळूण) याने आपले वाहन भरधाव आणि दारूच्या नशेत चालवून कोकरे यांच्या कारला समोरून थेट धडक दिली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या भीषण धडकेत इनोव्हा कारचे बरेच नुकसान झाले आहे. अपघातानंतर दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 23-07-2026














