साडवलीत सुरू होणार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

देवरुख : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आ.रा.स. अॅकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर, रत्नागिरी या संस्थेचे चौथे मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू होत आहे. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली, देवरुख येथे ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता या केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, शिक्षक, वकील, डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या केंद्राच्या स्थापनेमुळे कोकण विभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. या नवीन सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थी, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 04/Apr/2025

Lok. Tilak hospi.