गुहागर नगरपंचायतीकडून घरपट्टी ९६ टक्के तर पाणीपट्टी ९५ टक्के वसुल

गुहागर : गुहागर नगरपंचायतीने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील गुहागर नगरपंचायतीने ९६ टक्के घरपट्टी व पाणीपट्टीची ९५ टक्के रक्कम कर स्वरूपात वसुली केली आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार वसुली मोहीम राबवण्यात आली. कर वसुली मोहिमेस नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यानेच मोठ्या प्रमाणात कर वसुली झाल्याचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी सांगितले.

सन २०२४/२५ या आर्थिक वर्षातील गुहागर नगरपंचायत गुहागरची घरपट्टी ९६% व पाणीपट्टी ९५% कर वसुली झाली आहे. कर वसुली मोहिमेला नागरीकांनी प्रशासनाला उत्तम सहकार्य केल्यामुळे वसुलीची टक्केवारी समाधानकारक झाली आहे.

ही वसुली मुख्याधिकारी तथा प्रशासक स्वप्निल चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कर निरीक्षक सचिन जाधव, नगर अभियंता विजय भुतल, लेखापाल अमोल पुराणिक, स्वच्छता निरीक्षक प्रविण जाधव, वरिष्ठ लिपिक जनार्दन साटले, लिपिक प्रितम वराडकर, आश्विनी घाडगे, संदेश असगोलकर, सुनिल नवजेकर, प्रेरणा बेंडल, ओंकार लोखंडे, आशिष जोशी, पाणीपुरवठा कर्मचारी, रियाज झोंबडकर, अशोक तांबे, रविंद्र जोशी, चेतन ठोंबरे, विलास साटले, राजेंद्र पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी वसुलीचे ध्येय गाठता आले आहे.

गुहागर शहरातील नागरीक, व्यापारी वर्गापैकी अनेक करदाते मागणी बिल प्राप्त झाल्यानंतर लगेचच आपल्या घरपट्टी पाणीपट्टीची रक्कम जमा करणारे आहेत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाणसुध्दा कमी राहते. विहित मुदतीमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी भरणारे नागरीक तसेच व्यापाऱ्यांना नगरपंचायत प्रशासनातर्फे धन्यवाद देण्यात येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 05/Apr/2025