चिपळुणात आंबा मोहोर संरक्षण, रक्षक सापळ्यांचे वाटप

चिपळूण : तालुका कृषी अधिकारी चिपळूण व विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव येथे आंबा कीड रोग मोहोर संरक्षण व सिंधू रत्न योजने अंतर्गत फळमाशी रक्षक सापळे वाटप कार्यशाळेचे आयोजन आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये आ. निकम यांच्याहस्ते फळमाशी रक्षक सापळ्याचे वाटप करण्यात आले.
फळमाशी रक्षक सापळा फळमाशी नियंत्रणासाठी प्रभावी ठरत असून सर्व शेतकऱ्यानी आंबा बागेमध्ये कृषी विभागामार्फत मोफत वाटप करण्यात येणाऱ्या रक्षक सापळ्याचा वापर करावा.

तसेच कृषी विभागाच्या योजना राबवाव्यात असे आवाहन आमदार निकम यांनी केले. तसेच फळमाशी रक्षक सापळ्याचे वाटप वेळेत व तातडीने करण्याबाबतच्या सूचना त्यांनी कृषी विभागास दिल्या. उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. तसेच हापूस आंब्याचे भौगोलिक मानांकन, मँगोनेट नोंदणी इत्यादीबाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी कृषी यांत्रिकीकर, मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी आंबा पिकावरील कीड रोग नियंत्रण बाबत माहिती दिली. रक्षक सापळा जोडणी व वापराचे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक संतोष जाधव यांनी दाखविले. कृषी पर्यवेक्षक एस. आर. भोसले यांनी आभार मानले.

कृषी सहाय्यक दादा खारतोडे यांनी नियोजन केले. यावेळी कार्यक्रमास शिरगाव सोसायटीचे अध्यक्ष जयंत शिंदे, कुंभार्ली गावचे सरपंच रवींद्र सकपाळ, मुंढे गावचे सरपंच श्याम खेतले, वि.का.स. सेवा सोसायटीचे संचालक प्रभाकर शिंदे, राजेंद्र नाचरे, पोफळी ग्रा.पं. सदस्य बामणे, अनिल शिंदे, कृषी सहाय्यकचव्हाण, कणसे, कृषीसेवक मोरे, सावंत तसेच शिरगाव पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 05/Apr/2025