मंडणगड : ‘त्या’ अधिकाऱ्याकडून आशा स्वयंसेविकांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार

मंडणगड : एक अधिकारी आशा स्वयंसेविकांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याची निवेदनाद्वारे तक्रार तालुक्यातील आशा स्वयंसेवकांनी गुरुवारी (ता. ३) तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्याकडे सादर केली.

या निवेदनात म्हटले आहे की, एका अधिकाऱ्याने पेवेतील आशांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. ‘त्या’ अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी. याबाबत कार्यवाही न झाल्यास मंडणगड तालुक्यातील सर्व आशा स्वंयसेविका कामबंद आंदोलन करणार आहेत.

तसेच त्यांची तत्काळ तालुक्याच्या बाहेर बदली न झाल्यास आशा स्वंयसेविका कामावर हजर होणार नाहीत, याबाबत योग्य तो न्याय मिळावा. या विषयासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित गावंडे यांनी माध्यमांना या विषयासंदर्भात तक्रारदार आशा स्वंयसेविका यांचे म्हणणे व बाजू मी ऐकून घेतली असल्याचे सांगितले.

तसेच ज्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून पत्र काढण्यात आले आहे. तो खुलासा प्राप्त झाल्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा लेखी स्वयंस्पष्ट अहवाल वरिष्ठ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने रितसर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कारवाईकडे तालुक्याचे लक्ष
वार्षिक लेखापरिक्षणाच्या निमित्ताने ३ एप्रिल रोजी तालुक्यातील दीडशेहून अधिक आशा स्वयंसेविका भिंगळोली येथे आलेल्या असताना तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर या प्रश्नावर मोठा गदारोळ झाला. त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर झाले. आता जिल्हा आरोग्य अधिकारी या प्रकरणात कोणती कारवाई करतात, याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 05/Apr/2025