खेड : तालुक्यातील खेड-बिरमणी मार्गावर हुंबरी येथे शनिवारी सायंकाळी एसटी बस व डंपर रस्त्याची बाजू काढताना एकमेकांना घासून अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
खेड बसस्थानकातून दि.५ रोजी सायंकाळी ५ वाजता सुटलेली खेड – बिरमणी ही बस (एम एच १४बी टी १३७२) ही प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. बस हुंबरी गावानजीक आली असताना समोरून येणाऱ्या डंपरला बाजू देताना बस व डंपर एकमेकांना घासले. यावेळी चालक बाजूला बसलेल्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. रस्ता आधीच अरुंद व दुसऱ्या बाजूला खोल दरी अशी भौगोलिक परिस्थिती असतानाही बस चालक बेदरकारपणे गाडी चालवत होता, असे प्रवाशांना सांगितले.
काही दिवसांपूर्वी पन्हाळजे मार्गावर एक चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याची निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या चालकाचे निलंबन केले होते. परंतु, आता पुन्हा बिरमणी मार्गावर बस चालकाबाबत प्रवाशांकडून तक्रार आली असून संबंधित चालकाला प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 07/Apr/2025














