खेड नगरपालिका कचरा टाकणाऱ्यांवर करणार दंड

खेड : खेड नगरपालिकेने माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहर कचरामुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र दुसरीकडे भर रस्त्यासह नदी व गटारात सर्रासपणे फेकला जात असून यापुढे कचरा फेकणारे कारवाईच्या कचाट्यात अडकणार आहेत. कुठेही नागरिक कचरा टाकताना आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.

नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून दिवसाकाठी ८ टनाहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावून शहर चकाचक ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. एकीकडे शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.

दुसरीकडे जगबुडी नदीसह गटारे व मोक्याच्या ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जात आहे. नदीपात्रातही नजर चुकवून कचरा टाकला जात असल्याचे समोर आले आहे. प्रशासन आता कडक पावले उचलणार आहे. यापुढे गटारे, रस्त्यावर कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 07/Apr/2025