संगमेश्वर : शिवसैनिकांनो न डगमगता कामाला लागा, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नावडी जिल्हा परिषद गट्टातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकत्यांच्या बैठकीत शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला.
गावमळा येथील या बैठकीला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, लोकसभा क्षेत्र संघटक नेहा माने, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप बोरकर, तालुकासंघटक संतोष थेराडे, उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर, महिला उपतालुका संघटक मनीषा बने, महिला विभागसंघटक प्रिया सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक सतीश पाटणे, सलाउद्दिन बोट, आदी उपस्थित होते. यावेळी नावडी पंचायत समिती गणामध्ये नवीन पदनियुक्त्या करण्यात आल्या. नावडी पंचायत समितीचे विभागप्रमुख म्हणून वैभव मुरकर आणि अल्पसंख्याक विभाग प्रमुख म्हणून रईस अलजी यांची नियुक्ती करण्यात आली, असे तालुका प्रमुख बंड्याशेठ बोरुकर यांनी जाहीर केले. तसेच उपस्थित शिवसैनिकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले.

याप्रसंगी रवींद्र माने यांनी शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आक्रमक भाषण केले. तर संतोष थेराडे यांनी कुठेही गरज पडल्यास आम्ही तयार आहोत, असे आश्वासन दिले. प्रकाश घाणेकर यांनी शिवसैनिकांना संघटना बळकटीसाठी कान मंत्र दिला.
लवकरच वाडीनिहाय बैठका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुन्हा तालुक्यात पक्ष बांधणीसाठी वरिष्ठ पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. यावेळी गावातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी जाऊन गावनिहाय बैठका त्यानंतर वाडीनिहाय बैठका घेऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे नावडीतील बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 07/Apr/2025














