खेड : श्री रामवरदायिनी देवीची १२ रोजी यात्रा

खेड : तालुक्यातील चोरवणे गावातील श्री रामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा १२ रोजी होत आहे. ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे.

देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तीभावाने, श्रध्देने साजरे केले जातात. देवीचे मंदिर हेमाडपंती असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे. अशा या जागृत देवीची यात्रा १२ रोजी सुरू होत आहे. सायंकाळी ६ वाजता लाट चढवण्यात येइल. ७वाजता देवीची आरती झाल्यानंतर रात्री ९ वाजता परिसरातील देवदेवतांच्या पालख्यांचे आगमन होईल. १० वाजता देवी-देवता बरोबर आलेल्या मान्यवरांचे स्वागत, ११ वाजता ढोल-ताशांच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचवत छबिना काढण्यात येईल. १२ वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ, श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी आणि सभासद व ग्रामविकास मंडळ चोरवणे, मुंबई-पुणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 07/Apr/2025