ओरी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे यांची विस्तार अधिकारीपदी नियुक्ती

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील ओरी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश जानू कळंबटे यांची १ एप्रिलपासून रत्नागिरी जिल्हा परिषद येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश जानू कळंबटे यांनी १९८५ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी ८ वर्ष उपशिक्षक, २० वर्ष पदवीधर शिक्षक म्हणून तर ११ वर्ष केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले.

गेली ३९ वर्षपिक्षा अधिक काळ ते शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रकाश कळंबटे यांची शिक्षण विस्तार अधिकारी नियुक्त झाल्याने गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 09/Apr/2025