लांजा : सिंधुरत्न योजनेअंतर्गत लांजा तालुक्यामध्ये आंबा बागेतील फळमाशीचे नियंत्रण करण्यासाठी रक्षक सापळे व ल्यूर्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठामार्फत एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत प्रति हेक्टरी ४ रक्षक सापळे वेगवेगळे ठिकाणी बागेत लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. रक्षक सापळ्यात फळमाशीच्या नरांना आकर्षित करणारा मिथाईलं यूजीनॉल नावाचा कामगंध वापरला जातो. हा कामगंध कापसाच्या बोळ्याला लावून रक्षक सापळ्यात ठेवला जातो. या कामगंधामुळे फळमाशीचे नर सापळ्याकडे आकर्षित होतात व त्यात अडकून मरतात.
यामुळे फळमाशीचे पुढील प्रजोत्पादन थांबते व फळमाशी चा प्रादुर्भाव नियंत्रित करता येतो. रक्षक सापळे व ल्यूर्ससाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी लांजा, कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 10/Apr/2025














