Devrukh Marleshwar Road Tree: देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील ‘आकेशिया’चे झाड बनलेय धोकादायक; कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती

कासारकोळवण बसथांब्यावळील विठाबाई देवस्थाननजीकची घटना

देवरूख:

Devrukh Marleshwar Road Tree | प्रसिद्ध मार्लेंश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील एक ‘आकेशिया’चे झाड सध्या प्रचंड धोकादायक बनले आहे. मुसळधार पावसामुळे हे झाड कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळण्याच्या स्थितीत आहे. असे असतानाही देवरूख सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मात्र सुस्त अवस्थेत असल्याचा आरोप होत आहे. या विभागाला अखेर जाग कधी येणार, असा संतप्त सवाल या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक आणि भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.

रस्त्याच्या बाजूला पूर्णतः झुकले झाड; मुसळधार पावसामुळे धोका वाढला

हजारो भाविक व पर्यटक दररोज मारblockळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या मार्गावरून येत असतात, त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच मोठी रेलचेल असते. अशातच या मार्गावरील कासारकोळवण बसथांबा येथील विठाबाई देवस्थानजवळ असलेले आकेशियाचे झाड हे एका बाजूला, म्हणजेच थेट मुख्य रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे झुकले आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडे मुसळधार पाऊस कोसळत असून, या पावसामुळे झाडांची मुळे कमालीची कमकुवत झाली आहेत. परिणामी, हे झाड केव्हाही उन्मळून रस्त्यावर पडू शकते अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

मोठ्या अपघाताची शक्यता; बांधकाम विभागाला दिला इशारा

या धोकादायक झाडाजवळून एखादे वाहन जात असताना जर हे झाड अचानक कोसळले, तर मोठी जीवितहानी किंवा गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी त्वरित हे झाड तोडून बाजूला करावे, अशी आग्रही मागणी वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. हे झाड त्वरित न तोडल्यास व भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला केवळ आणि केवळ बांधकाम विभागच जबाबदार असेल, असा थेट इशारा वाहनचालक व येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 03-07-2026