खेड : खेड नगरपालिकेकडून २०२५ २६ या आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ नसलेला आणि ९५ कोटी ६३ लाख ३ हजार ९४५ रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ९५ कोटी २८ लाख १३ हजार ७७० रुपयांची खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी शिवाजी जगताप, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत यावर्षीचे अंदाजपत्रक मांडण्यात आले. यामध्ये नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा वाढीव कराचा बोजा लादण्यात आलेला नाही. १४ कोटी ५५ लाख ९० हजार ७२४ रुपये इतकी आरंभीची शिल्लक असून, ८१ कोटी ७ लाख १३ हजार २२१ रु. कराच्या माध्यमातून जमा झाले आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात सामान्य प्रशासन विभाग, निवृत्तीवेतन विभाग, करवसुली विभागासाठी ३ कोटी ३३ लाख १३ हजारांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
अग्निशमन व दिवाबत्ती विभागावर ७६ लाख ३६ हजार ९९६ रुपये खर्च केले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागासाठी ३ कोटी ८८ लाख ८५ हजारांच्या खर्चाची भरीव तरतूद करण्यात आली आहे स्वच्छता विभागासाठी २ कोटी ९३ लाख २१ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. दवाखाना विभागावर ४७ लाख २ हजार; तर सार्वजनिक उद्यानासाठी १३ लाख ६५ हजार ५०० इतकी तरतूद करण्यात आली. बांधकाम विभागासाठी २ कोटी ९२ लाख ५० हजार इतक्या भांडवलो यार्चासाठी ६ कोटी ९८ लाख २७ हजारांची तरतूद करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 19/Apr/2025














