खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलात ‘फायर फायटिंग बाईक’ दाखल

खेड : कोकणातील नागमोडी, अरुंद रस्ते आणि डोंगराळ भागांमध्ये आग लागल्यास मोठ्या अग्निशमन वाहनांना पोहोचणं मोठं आव्हान ठरतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने एक महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य निर्णय घेतला आहे. अग्निशमन सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आता खास ‘फायर बाईक’ दाखल झाली आहेत, या यंत्रणेचा वापर करून आपत्कालीन परिस्थितींना अधिक प्रभावीपणे सामोरं जाणं शक्य होणार आहे.

खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलात ही फायर फायटिंग बाईक कार्यरत झाली आहे. नजीकच्या तालुक्यात देखील फायर फायटिंग बाईक कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या बाईक मध्ये आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा बसवण्यात आली आहे. अरुंद रस्त्यावरून वेगाने जाऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी या वाहनाचा उपयोग होऊ शकतो. फायर फायटिंग बाईकचं स्थानिक नागरिकांतून देखील स्वागत होत आहे, ही यंत्रणा भविष्यात कोकणातील आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ही नवी यंत्रणा केवळ आग आटोक्यात आणण्यासाठीच नव्हे तर जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आपत्ती व्यवस्थापनातील हा एक टप्पा अधिक दृढ करणारा ठरणार आहे. अशा प्रकारच्या नवकल्पनांमुळे कोकणातील नागरिकांचं संरक्षण अधिक प्रभावी होत असल्याचं चित्र पुढे येत आहे.

दोन कर्मचाऱ्यांसह आग आटोक्यात आणण्याची क्षमता
या फायर बाईकचा मुख्य उद्देश मोठ्या वाहनांना पोहोचता न येणाऱ्या भागात वेगाने पोहोचून आग आटोक्यात आणणं.
विशेषतः कोकणातील अरुंद गल्ल्या, बाजारपेठा, तसेच उंचसखल भाग यासाठी ही बाईक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
फायर फायटिंग बाईकची खास वैशिष्ट्‌येः ३५ लिटर पाण्याची वाहून नेण्याची क्षमता
अग्निशमनाच्या सुरुवातीसाठी अत्यंत उपयुक्त पोर्टेबल पंपः
तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी रॉयल एनफिल्ड बुलेटवर आधारित रचना
दमदार आणि विश्वासार्ह सायरन, फायर एक्स्टिंग्विशर लाऊडस्पीकरसह सज्जः व जनजागृती आणि त्वरित प्रतिसादासाठी उपयुक्त वाहन
चिंचोळ्या भागातही जाण्यासाठी उपयुक्त

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 21/Apr/2025