लांजा : भांबेड येथील चिखल नांगरणी स्पर्धेत नितीन देसाई, स्वराज गुरव विजेते

लांजा : महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेनेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे यांच्या सौजन्याने लांजा तालुक्यातील भांबेड येथे शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नितीन देसाई व स्वराज गुरव यांनी पटकावला.

लांजा तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात वस्तू स्वरुपात आकर्षक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेला कोकण भागातून एकूण ८५ स्पर्धक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. तालुक्यातील भांबेड पवारवाडी येथे घाटी व गावठी अशा दोन गटामध्ये स्पर्धा झाली.

यामध्ये घाटी गट प्रथम क्रमांक नितीन देसाई (पाली), द्वितीय केदारलिंग-दत्ताराम गुरव (बोंडे), तृतीय द्वारकानाथ माने (कुरचुंब), चतुर्थ आई जुगाई (चोरवणे), पाचवा निलेश नागवेकर, सहावा बिरोबा नवलाई (विवली), आदित्य शिर्के (देवळे) यासह गावपातळीवर मनाची गदा परशुराम रसाळ तर गावठी गट- प्रथम क्रमांक स्वराज गुरव, द्वितीय नवलाई प्रसन्न (गावाणे), तृतीय प्रवीण आग्रे (शिरवली), चतुर्थ जय सांबा (पाठगाव), पाचवा भैरी चंडिका-राजू लाड (शिरवली), सहावा चंडिका-राजू लाड (शिरवली), सातवा क्रमांक संतोष सावंत (पाली) यांनी पटकावला. नामांकित बैल जोड्यांच्या सहभागामुळे चिखल नांगरणीचा थरार तालुक्यातील नागरिकांनी अनुभवला.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे, प्रभाकर रेवाळे, सारिम वाघू, संजय चव्हाण, संकेत शिवगण, सुजल साळ, विलास चव्हाण, मनसे तालुका उपाध्यक्ष सुरेश कुरणेकर, मनविसे तालुका अध्यक्ष संकेत कोलते आदी उपस्थित होते.

Infigo Eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 09/Oct/2024