भाजपच्या राजापूर तालुका पश्चिम विभाग अध्यक्षपदी मोहन घुमे तर पूर्व विभाग अध्यक्षपदी अॅड. एकनाथ मोंडे

राजापूर : भाजपच्या राजापूर तालुका पश्चिम विभाग अध्यक्षपदी मोहन घुमे तर पूर्व विभाग अध्यक्षपदी अॅड. एकनाथ मोंडे यांची निवड करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर लक्ष ठेवून या नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. राजापूर तालुक्याचा विचार करता पश्चिम विभागासाठी मोहन घुमे व पुर्व विभागासाठी अॅड. एकनाथ मोंडे या दोघांच्या रुपाने तालुक्याला चांगले नेतृत्व मिळाल्याने पक्षवाढीला बळ मिळणार आहे यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे.

दरम्यान, राजापूर भाजप तालुका कार्यालयात २० रोजी सायंकाळी उशीरा भाजपच्या निरीक्षकांच्या वतीने मोहन घुमे व एकनाथ मोंडे यांच्या नावाची पश्चिम व पूर्व विभाग तालुका अध्यक्ष पदासाठी निवडीची घोषणा करण्यात आली आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दोघांनी ही छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुयोगा जठार, महिला शहर अध्यक्ष स्नेहा रहाटे, कार्यालय प्रमुख संदेश विचारे, संदीप तेरवणकर, श्रुती ताम्हणकर अॅड. सुशांत पवार, नागेश शेट्ये, शीतल रहाटे, प्रल्हाद तावडे, प्रतिक निकम, सोनल केळकर, अमर वारीशे आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 22/Apr/2025