खेडजवळ कार अपघातामध्ये तिघे जखमी

खेड : तालुक्यातील कशेडी बोगद्यानंतर पवारवाडी येथे दि. २६ रोजी दुपारी सुमारास दोन वाहनांमध्ये अपघात होऊन तिघे जखमी झाले. यामध्ये एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२५/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ आणि मोटार वाहन कायद्यानुसार या करण्यात आली आहे.

प्रसाद प्रकाश खरे (वय ३४, रा. पुणे) हे आपल्या कुटुंबीयांसह युंदाई आय-२० (क्र. एमएच-१४-एलई ०२६१) या कारने पुण्याहून खेडकडे प्रवास करत होते. कशेडी बोगद्यानंतर सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहतूक दुसऱ्या लेनवर वळवण्यात आली होती. त्या दरम्यान, समोरून येणाऱ्या मारुती डिजायर (क्र. एमएच २७-बी.झेड.-१७१७) वाहनाचे चालक ज्ञानेश्वर भाऊराव बालटकर
(वय २४, रा. वालुरता, शेलु, जि. परभणी) याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे गाडी चालवत फिर्यादीच्या कारला धडक दिली.

अपघातात प्रसाद खरे यांच्या पत्नी प्रिया खरे (२६), वडील प्रकाश खरे (६६), आणि आई मनीषा खरे (६१) हे किरकोळ जखमी झाले असून, मनीषा खरे यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 28/Apr/2025