‘त्या’ नाल्याबाबत दापोली नगरपंचायतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

दापोली : दापोली नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील लाल कट्टा ते नगरपंचायत कार्यालयाच्या मागील भागातील नाल्याच्या दोन्ही बाजूना काँक्रिटची संरक्षक भिंत व तळाशी काँक्रिटचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र या नाल्याची रूंदी कमी करण्यात आली असल्याने पावसाळ्यात नगरपंचायतीच्या आवारात तसेच कर्मचारी वसाहतीत या नाल्यातील पाणी घुसण्याची शक्यता असल्याचे पत्र नगराध्यक्षा ममता मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

या संदर्भात ४ मार्चला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दापोली कार्यालयात पत्रव्यवहार करूनही हे काम अजून सुरूच आहे. त्यामुळे येणाऱ्या पूरपरिस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल, असा इशारा नगराध्यक्ष ममता मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एका पत्राद्वारे दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 28/Apr/2025