चिपळूण : पाग येथील श्री सुकाई मंदिराचा कलशारोहण उद्यापासून

चिपळूण : शहरातील पाग येथील श्री सुकाई मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहोळा २९ व ३० असा दोन दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त २९ रोजी दुपारी ३.३० वाजता कलश आणण्यासाठी ग्रामदेव जुना कालभैरव मंदिर ते श्री सुकाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे.

जीर्णोद्धार सोहोळ्यानिमित्त काढली जाणारी मिरवणूक श्री जुना कालभैरव मंदिर, शिवाजी चौक, नवीन एसटी स्टैंड, पाग पॉवर हाऊस मार्गे श्री सुकाई देवी मंदिर असणार आहे. रात्री ८.३० वाजता श्री सुकाई मंदिरात महाआरती तर रात्री १०.३० वाजता सुगम संगीत मराठी भावगीत व भक्तीगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. ३० रोजी सकाळी पाग येथील श्री सुकाई देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा उद्यापासून ६ वाजता सनई चौघडा, वादन सकाळी ८.३० ते १०.३० वाजता अभिषेक, होम हवन, प्रासाद वास्तू व धार्मिक विधी, सकाळी १०.३० ते ११.३० वाजता कलशारोहण समर्थ भक्त महेश बुवा दातार यांच्या हस्ते होईल. दुपारी ११.३० ते १.३० वाजता मान्यवर, देणगीदार माहेरवासिनी यांचा सन्मान सोहळा व मनोगते होतील.

सायंकाळी ६ वाजता कीर्तनकार पप्पू महाराज नाडे (पाटण, जि. सातारा) यांचे कीर्तन तर रात्री १०.३० वाजता “लावण्यवती अप्सरा” हा करमणुकीचा कार्यक्रम होईल. तरी श्री सुकाई देवी मंदिराच्या कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा आणि कलशाची मिरवणूक शोभायात्रा कार्यक्रमाला चिपळूणवासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सुकाई देवी देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 28/Apr/2025