रत्नागिरी : शासनाच्या सेवा ऑनलाईन करण्याचे फर्मान

रत्नागिरी : शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा. १५ ऑगस्टपर्यंत जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्या विभागाला दरदिवशी प्रत्येक सेवेसाठी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना या विषयाबाबत माहिती व्हावी यासाठी या अधिनियमाचा अभ्यासात समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सध्या हजारापेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. जवळपास ५८३ सेवा ऑनलाइन दिलेल्या आहेत. अजून ३०० सेवा या ऑनलाइन आणायच्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 30/Apr/2025