पाक रेंजर्सनी चौक्या सोडल्या, झेंडाही उतरवला..

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Terrorist) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून दोन्ही देशाचे सैन्य अलर्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) रणनीती आखली जात असून तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत त्यांच्या बैठका सुरू आहेत.

मंगळवारी सायंकाळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीजीए अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत मोदींनी चर्चा केली. या बैठकीत सैन्य दलास संपूर्ण अधिकार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भारताकडून उचलली जात असलेली पाऊले पाहता पाकिस्तान घाबरुन गेला आहे. पाकिस्तानी सैन्यालाही धडकी भरली असून जम्मू काश्मीरच्या एलओसी बॉर्डरवर (Border) सीझफायर झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान रेंजर्सकडून सिझफायरिंगनंतर भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून पळ काढलाय. विशेष म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी स्वत:च त्यांच्या चौक्यांवरील झेंडा खाली उतरवल्याचीही माहिती आहे. LOC सीमारेषेवरील 20 चेक पोस्टवर जोरदार चकमक झाल्याची माहिती आहे, पाकिस्तानकडून हा गोळीबार होत असून भारतीय सैन्य दलही आत घुसून जशास तसे प्रत्त्युतर देत आहे. सीमारेषेवरील नौशेरा, सुंदरबनी, अखनूर, बारामूला आणि कुपवाड़ या सीमारेषेला लगत असलेल्या प्रदेशात ही चकमक सुरू आहे.

भारताकडून लवकरच हल्ला होण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे, त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य आणि राज्यकर्त्यांनीही गतीमान हालचाली सुरू केल्या आहेत. भारताकडून कोणत्याही क्षणी एअर स्ट्राईक होऊ शकतो, त्यामुळे पाकिस्तानने इस्लामाबाद आणि लाहोरसाठी 2 मे पर्यंत नोटम म्हणजे नो टू एअरमॅन जारी केले आहे. त्यानुसार, आता हे दोन्ही राज्य नो फ्लाय झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे, या प्रदेशातून कुठलीही हवाई वाहतूक होणार नाही, कुठलेही विमान व हेलिकॉप्टर उड्डाण करणार नाही. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने गंभीरतेने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्यातच, भाग म्हणून 5 मोठे निर्णय भारत सरकारने घेतले आहेत.

Radhakrushna patapedhi

सुरक्षा दलाचे विशेष लक्ष

दरम्यान, पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या शस्त्रसंधीचं उल्लंघन किंवा सीमारेषेपलिकडून होणाऱ्या घुसकोरीवर भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. तसेच, भारताने बॉर्डवरील आजच्या प्रत्युत्तराने स्पष्ट संदेश दिला आहे. तर, सीमारेषेवरील प्रत्येक हालचालीवर तिन्ही सैन्य दलाचे व राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींचे विशेष लक्ष आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 30-04-2025