पाण्याचे मूल्य समजण्यासाठीच जलसाक्षरतेची गरज : सीईओ कीर्तीकिरण पुजार

रत्नागिरी : अनमोल पाण्याचे मूल्य समजून घेण्यासाठी जलसाक्षरतेची गरज असून, योग्य शिक्षणातून साक्षरता येते. विशेषतः जेव्हा जलस्रोत समजून घेणे, व्यवस्थापित करणे आणि वापरणे या बाबी येतात तेव्हा शिक्षण अधिक महत्त्वाचे बनते, असे प्रतिपादन जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी व मुख्य संसाधन केंद्र, जे.पी.एस. फाऊंडेशन, लखनौ यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी रत्नागिरी येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीमधील प्रति ग्रामपंचायत ०५ या कार्यकारी अधिकारी राहुल देसाई. प्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती, ग्रामपंचायत स्तरावरील अनुसूचित जाती-जमाती प्रभागसंघातील महिला, जलसुरक्षक व प्राथमिक सहाय्यकारी संस्था अशा एकूण तालुक्यातील ४७० प्रतिनिधींना दोन दिवशीय प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी मागील काही वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पाण्याचा वापर कमी करण्यासाठी व भविष्यातील टंचाई कमी करण्यासाठी जलसाक्षरतेची नितांत गरज आहे, असे नमूद करून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी व कर्मचारी यांनी तालुकास्तरीय व समुदाय स्तरावरती होणाऱ्या दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कीर्तीकिरण पुजार यांनी केले.

प्रशिक्षणासाठी प्रवीण प्रशिक्षक म्हणून महेश आरळेकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद रत्नागिरी, प्रा. पांडुरंग पिसाळ आष्टा महाविद्यालय, सांगली, अनिरुध्द पळणीकर सल्लागार, बॉटर फिल्ड टेक्नोलॉजी, रत्नागिरी, हर्षदा वाळके, मंगेश नेवगे, गोविंद भारद्वाज, वैष्णवी गुरव, सुनील आडके आदी पाणी या घटकांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार शिंदे यांनी केले. मान्यवरांचे आभार मंगेशजी नेवगे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 10/Oct/2024