खेड : सामाजिक ऐक्य आणि मराठा समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या भारत सरकार मान्यताप्राप्त मराठा स्वराज्य संघटनेतर्फे क्रांती महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच आमदार प्रवीण दरेकर (गटनेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी मनोज शिंदे (माजी विरोधी पक्षनेते, ठाणे महानगरपालिका) यांना मराठारत्न, तर राजेंद्र पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई) यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सदानंद भोसले यांनी दिली. हा कार्यक्रम उद्या दि. ९ मे रोजी सकाळी ११ वाजता खेड तालुक्यातील बीजघर येथे होणार आहे.
याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे अभिजीत दरेकर यांनाही समाज गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार. या कार्यक्रमास अनेक नामवंत मान्यवर, स्थानिक कार्यकर्ते, विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 09/May/2025














