रत्नागिरी : महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे विलिनीकरण

रत्नागिरी : महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकांच्या विलिनीकरणानंतर ‘महाराष्ट्र ग्रामीण बँक नावाची एकमेव प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणून १ मेपासून काम सुरू केले आहे.

या विलिनीकरणानंतर आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवा क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे. रत्नागिरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाचा पत्ता महाराष्ट्र ग्रामीण बँक, प्रादेशिक कार्यालय, भैरवनाथ कृपा, ७९२ पी, अपराध रुग्णालयाच्या समोर, मजगाव रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी असा असणार आहे, असे बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक पद्मसिंह पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 09/May/2025