गुहागर : शृंगारतळी येथे पर्स, पाऊच बनवण्याचे प्रशिक्षण

गुहागर : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती गुहागर, प्रकृती फाऊंडेशन व मर्म संस्था यांच्या वतीने पर्स, पाऊच आणि सॅक तयार करण्याचे तीन दिवशीय प्रशिक्षण शृंगारतळी येथे ४ ते ६ मे दरम्यान घेण्यात आले.

बचत गटातील महिलांनी प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रशिक्षणात बचत गटातील महिलांना पर्स जलद करण्यासाठी टिप्स तसेच विक्री व्यवस्था मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या प्रेरणेतून तसेच प्रकृती फाऊंडेशनच्या मिलन जंगम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. मेधा शहा तसेच मुग्धा देसाई (मुंबई) यांनी सहभागी महिलांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणला महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 09/May/2025