खेड : कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे स्थलांतर

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेले कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्र आता कशेडी गाव हद्दीतील नवीन मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील भुयारी मार्गालगत नवीन वास्तूत स्थलांतरित करण्यात आले आहे. कशेडी बंगला ग्रामस्थांनी पोलिस कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणा दरम्यान नवीन महामार्ग भोगाव हद्दीतून कशेडी भुयारी मार्गे जात आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक कशेडी भुयारी मार्गे होत असल्याने कशेडी पोलिसांना महामार्गासह कशेडी भुयारी मार्गावर गस्त ठेवण्यासाठी महामार्ग प्रशासनाकडून नवीन वास्तूची निर्मिती करून कशेडी घाटमाथ्यावर असलेला कशेडी पोलीस वाहतूक नियंत्रण कक्ष स्थलांतरित करण्यात आला.

यावेळी कशेडी ग्रामस्थांकडून कशेडी टेंपचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे, पोलीस नाईक शंकर कुंभार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय मोरे, राजन माजळकर, गजानन रामागडे, अनिकेत मोहिते, संजय चिकणे, पोलीस मित्र महेश रांगडे आदीना कशेडी येथील ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कशेडीचे पोलीस पाटील संदेश दरेकर, प्रवीण मोरे, मुकुंद मोरे, निलेश अजगनकर, दिलीप दरेकर, सुरेश दरेकर, विष्णू सकपाळ आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 09/May/2025