रत्नागिरीचे डॉ. अतुल ढगे यांचा दिल्ली येथे प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : प्रसिद्ध मनोविकारतज्ञ आणि लैंगिक समस्यातज्ञ डॉ. अतुल ढगे यांना त्यांच्या मानसिक आरोग्य व लैंगिक आरोग्य क्षेत्रातील क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच ‘द मोस्ट ट्रस्टेड सायकियाट्रिस्ट अँड सेक्सोलॉजिस्ट (महाराष्ट्र) 2024’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार त्यांना ‘प्राइड ऑफ भारत’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम 14 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथील ITC वेलकम हॉटेल द्वारका येथे पार पडला.

हा पुरस्कार त्यांच्या मनोविकार व लैंगिक आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल देण्यात आला आहे. डॉ. ढगे यांनी फक्त वैद्यकीय सेवाच केली नाही तर समाजातील विविध थरांमध्ये मानसिक आणि लैंगिक समस्यांच्या प्रबोधनासाठी त्यांचा विशेष सहभाग आहे. त्यांनी मनोविकार आणि लैंगिक समस्या असलेल्या अनेक रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे. ‘माइंडकेअर एक्सप्रेस’, ‘माइंडकेअर मॅरेथॉन’, ‘जागर मनोआरोग्याचा’, ‘मनोमित्र’ व ‘गाव तेथे मानसोपचार’ या सारख्या अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजाच्या सर्व थरांमध्ये मानसिक आरोग्याची जागरूकता वाढवली आहे. विविध कार्यशाळांद्वारे त्यांनी शालेय मुलांपासून ते व्यावसायिक व्यक्तींपर्यंत मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली आहे. याशिवाय, त्यांच्या असंख्य व्याख्यानांमुळे, ऑनलाईन सत्रांमुळे तसेच सोशल मेडिया वरून केलेल्या जनजागृतीमुळे, दूरदर्शन तसेच आकाशवाणी वरील कार्यक्रमांमुळे आणि समाजातील विविध वर्गांपर्यंत पोहोचल्यामुळे ते रुग्णांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. डॉ. ढगे यांच्या अनन्य उपक्रमांमुळे हजारो रुग्णांना मानसिक आरोग्याच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी मदत झाली आहे. आज फक्त रत्नागिरी, नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून लोक मानसिक आजार, लैंगिक समस्या, व्यसनमुक्ती, समुपदेशन यासाठी डॉ अतुल ढगे यांच्याकडून उपचार घेतात. मनोविकार आणि लैगिक समस्या या विषयांवर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या डॉ. ढगे अनेक रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. त्यांनी विविध प्रसंगी मान्यता प्राप्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून सहभाग घेतला आहे ज्यामुळे त्यांच्या अभ्यास व अनुभवाचा फायदा इतर वैद्यकीय तज्ञांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न झाला आहे.

मानसिक आरोग्य आणि लैंगिक आरोग्य या क्षेत्रात अनेक जण आजही मदतीची गरज असलेल्या मानसिक आरोग्याच्या व लैंगिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. या लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. ही आवड आणि तळमळ, मानसिक आरोग्य आणि सेक्सोलॉजीतील कलंक दूर करण्यासाठी समाजात जाऊन जागरूकता निर्माण करणे आणि सतत अद्ययावत राहणे आणि प्रगतीशील दृष्टिकोन ठेवणे हे आपल्या यशामागचे कारण असल्याचा सल्ला त्यांनी नवोदितांना आपल्या मुलाखतीमध्ये दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 18-09-2024