संगमेश्वर : पंधरावा वित्त आयोगांतर्गत धामणी आरोग्य उपकेंद्राला साहित्य वाटप

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निर्मल ग्राम पंचायत धामणी कडून प्राथमिक आरोग्य केंद्र बुरंबी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र धामणी साठी पंधरावा वित्त आयोग सन २०२२-२३ अंतर्गत आराखड्यातील तरतूदीनुसार व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र धामणी यांच्या मागणीनुसार साहित्य वाटप करण्यात आले.

ओटी टेस्ट किट ट्यूब नग-१०, ओटी टेस्ट किट बॉटल नग-५, ऑटोक्लेव्ह मशिन नग१, ड्रम नग २. ड्रेसिंग ट्रॉली-१, डिजिटल हिमोग्लोबिन मीटर १, सिग्नोलवटेप नग-१००, गिंडी स्टील भांडे असे साहित्य देण्यात आले.

वित्त आयोगातंर्गत तरतूदीनुसार त्या त्या विभाग प्रमुखांच्या मागणीप्रमाणे आवश्यक गरजाधिष्टीत साहित्य आराखड्यात सूचवून तशी पूर्तता केल्यास नक्कीच गावच्या विकासात भर पडेल अशा प्रकारचे मनोगत सरपंच संतोष काणेकर यांनी व्यक्त केले. यावेळी धामणी गावचे प्रथम नागरिक संतोष काणेकर, उपसरपंच संगम पवार, ग्रामसेवक शेखर जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र धामणीच्या समुदाय आरोग्य अधिकारी, अश्विनी मेणे, आरोग्य सेविका सारिका साळवी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 12/May/2025