रेल्वे प्रवासादरम्यान झोपलेल्या प्रवाशाचा लॅपटॉप, रोख रक्कम अज्ञाताने लांबवली

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाच्या झोपेचा गैरफायदा उठवत त्याचा लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. ही घटना शुक्रवार ९ मे रोजी सकाळी ७ वा. सुमारास संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संद्रा सिरियक (२२, सध्या रा. चेंबुर, मुंबई मुळ रा. एर्नाकुलम, केरळ) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, फिर्यादी हा आपल्या मुळ गावी केरळला सुट्टया संपवून शिक्षणाच्या पनवेल या ठिकाणी येत होता. तो ८ मे रोजी गरीबरथ एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्याला उडपी रेल्वे स्टेशन गेल्यानंतर झोप लागली. ९ मे रोजी सकाळी ७ वा. सुमारास त्याची रेल्वे संगमेश्वर रेल्वे स्टेशन पास झाल्यानंतर त्याला जाग आली. तेव्हा त्याला जवळील सिटवर खिडकीच्या बाजुस ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्या बॅगमध्ये ३० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप आणि रोख ५ हजार रुपये असा एकूण ३५ हजाराचा ऐवज होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 13/May/2025