Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून 15 लाख 39 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. या वर्षी कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. यंदा मुलींच्या उत्तीर्णचे टक्केवारी ९६.१४ टक्के आहे. मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजे मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे.
माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीसाठी ६२ विषयांसाठी घेतली होती. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५ टक्के पेक्षा अधिक गुण पडलेले हे विद्यार्थी आहे. ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहे. म्हणजे ६० किंवा त्याहून अधिक टक्केवारी आणि ७५ टक्केपेक्षा कमी गुण असलेले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 13-05-2025
