रत्नागिरी : प्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाच्या वतीने काही वर्षापूर्वी एमएसआरटीसी अॅप सुरू केले होते. ही ऑनलाईन सेवा सुरू केल्यानंतर रत्नागिरीसह राज्यभरात या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीकर या अॅपचा वापर करीत असून त्याचा लाभ घेत आहेत. रत्नागिरीसह राज्यभरात आतापर्यंत ५ लाख जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळ आता डिजिटल दिशेने वाटचाल करीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली एस.टी. बस कधी येणार हाच प्रश्न पडत असतो. त्यामुळे त्यांची समस्या दूर करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वतीने एमएसआरटीसी कॉम्प्युटर अॅप सुरू केले.
या अॅपमुळे एकाच क्लिकद्वारे एस.टी.चे सध्याचे लोकशन कोठे आहे हे घरबसल्या कळत आहे. रत्नागिरीकरांनी या स्मार्ट अॅपचा चांगला वापर करीत असल्याचे चित्र आहे.
तिकीट आरक्षणासह अपघात, वैद्यकीय मदत ही या अॅपद्वारे मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी हा अॅप अद्याप डाऊनलोड केला नाही, त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून हा अॅप डाऊनलोड करावे व या अॅपच्या सुविधांचा वापर करावा, असेही सांगण्यात आले. तसेच एस. टी. महामंडळाच्या विविध अधिकृत वेबसाईटवर ही तत्काळ प्रवाशांना सेवा मिळत आहे.
स्मार्ट अॅप, साईट असले तरी बसेस वेळेवर नाहीच
एस.टी. महामंडळ आता डिजिटलच्या दिशेने वाटचाल करीत आहे. प्रवाशांच्या सोयी-सुविधासाठी आरक्षण अॅप सुरू केले तसेच अधिकृत वेबसाईटवर ही सेवा देत आहे. मात्र असे असतानाही एस.टी. वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे महामंडळाने एस. टी. बसेस वेळेवर सोडाव्यात, अशाच लेखी, अॅपद्वारे तक्रारी प्रवासी करीत आहेत.
या आहेत अॅपमध्ये सुविधा
एस.टी. बसचे लोकेशन ट्रेकिंग
तिकीट आरक्षण, ट्रिपची योजना
सुरक्षेसाठी इमरजेन्सी कॉलची सोय, वैद्यकीय, अपघाती मदत
ट्रिपचा प्लॅन असल्यास गाडी आरक्षित करता येते
एस.टी. बद्दल काय तक्रार असल्यास तक्रारही करता येते
जवळचे बसस्थानकचे लोकेशन समजते, मॅपची सोय
हे अॅप केवळ महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांसाठी असणार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 19/May/2025













