चिपळूण : आकले बौद्धविहाराचे आ. शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन

चिपळूण : आकले बौद्धवाडीतील नव्याने बांधण्यात आलेल्या बौद्धविहाराचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. विहारासाठी आमदार निकम यांनी निधी मंजूर करून दिला होता.

या उद्घाटनप्रसंगी आमदार निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत, विकासकामांबाबत आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

ग्रामपातळीवरील सुविधांचा विस्तार हा शासनाचा उद्देश असून, त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमी पुढे राहणार असल्याचे ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात भविष्यात समाजाच्या प्रगतीसाठी व मुलांच्या शिक्षणासाठी कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले. येणाऱ्या काळात अतिशय दर्जेदार सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतीक कार्यक्रम घेता येतील. उद्घाटन सोहळ्याला आमदार शेखरजी निकम यांचे समवेत राजुजी जाधव, स्वप्नील शिंदे , विजय टाकले, भाऊ जागुष्टे, गणेश गजमल, सतीश शिंदे, बाबू मोहिते, विनेश मोहिते, विशाल मोहिते, अरुण मोहिते, विजय मोहिते, संतोष मोहिते, गौतमदादा जाधव, सतीश मोहिते, संदीप मोहिते, प्रदीप मोहिते, वैभव मोहिते, राहुल मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 14-05-2025