खेड : शहरात सध्या तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना पाच रुपयांच्या स्टॅम्प तिकीटसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. महसूल कामी कागदी अर्जावर किवा स्टॅम्प पेपरवर लावण्यात येणारे कोर्ट फी तिकीटचा प्रचंड प्रमाणात तुडवडा होत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. नुकतेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.
त्यामुळे विद्यार्थी व पालक जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्नाचे दाखले आदी मिळवण्यासाठी लगबग करत आहेत. परंतु कोर्ट फी तिकीट गेले चार-पाच दिवस खेडमधील परवाना धारक स्टॅम्प विक्रेते तिकीट उपलब्ध नाही, असे सांगत असल्याने विद्यार्थ्यांची कामे रखडण्याची भीती आहे. काही तिकीट विक्रेते पाच रुपयांचे तिकीट संपले असल्याने त्याऐवजी वीस रुपयांचे तिकीट लावा, असा सल्ला देत असल्याचे चित्र असून नागरिकांना पाच रुपयांत होणाऱ्या कामासाठी जादा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
खेड शहरात चार ते पाच सरकारी परवाना धारण करणारे तिकीट विक्रेते आहेत. दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्याकडे महसूल, ग्रामीण पंचायतराज विभागांचीदेखील जबाबदारी आहे. त्यांच्या मतदारसंघात कोर्ट फी स्टॅम्पचा तुटवडा भासू लागल्याने तहसीलदार जिल्हाधिकारी याबाबत घालण्याची मागणी होत आहे. प्रांत, जिल्हाधिकारी याबाबत घालण्याची लक्ष मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 15/May/2025













