राजापूर : खरवते येथील शेतकरी दयानंद चौगुले यांनी केले भाताच्या ३० देशी वाणांचे संकलन

राजापूर : तालुक्यातील खरवते येथील प्रगतिशील शेतकरी दयानंद चौगुले यांनी आरोग्यदायी भाताच्या तब्बल तीस प्रकारच्या देशी वाणांचे संकलन केले. त्यामध्ये कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, गडचिरोली आदी राज्यांतील विविध भागांसह दिल्ली, आसाम, उत्तर प्रदेश या राज्यांमधील तीन ते साडेचार महिने कालावधी अन् मधुमेह, कर्करोग, सांधेदुखी या आजारांवरील औषधी गुणधर्म असलेल्या कॅल्शियमयुक्त देशी वाणांचा समावेश आहे. आरोग्यदायी असलेल्या देशी वाणांच्या बियाण्यांनी रत्नागिरी येथे झालेल्या कृषी विकास परिषदेमध्ये शेतकऱ्यांसह साऱ्यांना भुरळ घातली.

सुमारे शंभर वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी वाणांचा वापर केला जात होता, मात्र हायब्रीड वाणांच्या वापरामध्ये देशी वाण हदपार होऊ लागली आहेत. कमी खर्चामध्ये जादा उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा शेतकऱ्यांकडून अधिक वापर होत असला तरी आरोग्यदायी आणि विविध आजारांमध्ये औषधी म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या देशी वाणांचेही महत्त्व कमी झालेले नाही.

नव्या पिढीला देशी वाणांच्या औषधी गुणधर्माची फारशी माहिती नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीमध्ये विविध औषधी गुणधर्म असलेल्या देशी वाणांचे चौगुले यांनी संवर्धन केले आहे. या वाणांच्या बियाण्यांचे दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम या राज्यांसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, आजरा, गडचिरोली, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील परिसरातील आपल्या मित्रांच्या सहकायनि संकलन करून त्यांची गावर्षी शेतामध्ये रुजवात केली होती. रत्नागिरी येथे कृषी झाली. यामध्ये चौगुले यांनी देशी विसान सप्ताह व कृषी विकास परिषद’ वाणांची मांडणी केली होती.

त्याची शेतकऱ्यासह मान्यवरांना भुरळ पडली. जिल्ह्यासह अन्य भागांतील आलेल्या शेतकऱ्यांकडून या कार्यक्रमात पाचशे किलोहून अधिक देशी वाणांच्या बियाण्यांची खरेदी झाल्याची माहिती चौगुले यांनी दिली, अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी मागणी नोंदवल्याचे त्यांनी सांगितले.

चौगुले यांच्याकडे उपलब्ध असलेले भाताचे देशी वाण

आसाम बासमती, फुले समृद्धी, मधुराज, दिल्ली भात, मुंडगा (कोकण), पटणी (कोकण), काळी गजरी, आजरा घणसाळ, इंद्रायणी, सर्वंट (कोकण), गोरखपूर एसबीके, बासमती, वारंगळ, काळा जिरगा, बाल (कोकण), गोविंद भोग, भोगावती, काळा नमक, रक्तशाली, बेला (कोकण), कुडा (कोकण), चंपाकळी, जस्मीन, काळे भात, रक्तशाळी (कोकण), सोरटी (कोकण), वाडा कोलम, फुले राधा, बकासूळ, टायचण (कोकण).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 16/May/2025