संगमेश्वर : परचुरी लिंगायत वाडी येथून बेपत्ता झालेली विवाहित महिला अखेर संगमेश्वर पोलिसांनी तपास करीत 24 तासाच्या आता तीचा शोध घेतला.
परचुरी लिंगायतवाडी येथील सौ उपासना संजय लिंगायत ही बेपत्ता झालेली असल्याची खबर पती संजय लिंगायत यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी तपास करत 24 तासाच्या आत मध्ये तीचा शोध लावण्यात यश आले आहे.
सौ उपासना लिंगायत हिचा शोध घेत तीला पोलीसांनी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शेलार यांनी तपास केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 16/May/2025














