राजापूर : गेल्या काही दिवसांमध्ये तापमानासह वातावरणामध्ये झालेले बदल आणि तोंडावर पावसाळा आलेला असताना संभाव्य साथींच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शहरामध्ये आरोग्य विभागातर्फे ताप सर्वेक्षण व जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कंटेनर सर्वेक्षण सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झाला आहे. सातत्याने तापमानामध्ये वाढ होत असून जोडीला पाऊसही पडत आहे. बदललेल्या या वातावरणामध्ये तापसरीसारख्या काही साथींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संभाव्य साथींच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागातर्फे शहरामध्ये जलद ताप सर्व्हेक्षण व जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक व आरोग्यसेवकांची सहा पथके तयार करून त्यांच्याद्वारे गृहभेटी देऊन ताप सर्वेक्षण व कंटेनर सर्वेक्षण तपासणी केली. संशयित तापरुग्णांचे रक्तनमुने संकलन करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे सर्वेक्षण केले. गृहभेटीदरम्यान लोकांशी संवाद साधून आरोग्य शिक्षण देण्यात आले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 17/May/2025













