लांजा : वाडीलिंबू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू दिन उत्साहात

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबू येथे दि. 16/05/2025 रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

नागरिकांना वैद्यकीय अधिकारी Dr. शिवराज नवले सर यांनी डेंग्यू वरील माहितीपत्रिका दिली तसेच आरोग्य निरीक्षक श्री डी. व्ही. गुरव सर यांनी डेंग्यूबाबत करावायचे उपाय व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी Dr. व्ही. एस. कामत सर, Lab. Techn. श्रीम.एम.जे. मांडवकर मॅडम, आरोग्य निरीक्षक श्री. एस. ए. रेवाळे सर, LHV श्रीम. झगडे सिस्टर, आरोग्य कर्मचारी श्रीम. एम. एम. आग्रे सिस्टर व श्री.एस.ए. कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 17/May/2025