खेड : चोरद नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

खेड : तालुक्यातील भरणे येथे चोरद नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. देवेंद्र दिलीप राणे (२६, रा. तुळशी बुद्रुक, ता खेड) असे त्याचे नाव आहे.

शिंदेसेनेचे खवटी विभागप्रमुख दिलीप राणे यांचा देवेंद्र हा मुलगा होता. उधळे येथे नदीत मित्रांसह पोहण्यासाठी गेला असताना देवेंद्रचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. खेड पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 17/May/2025